ठाणे - बाळकुम परिसरातील इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून कासवाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना 1 मेला घडली होती. दरम्यान या प्रकरणी आता कासवाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अम्मा केअर फाऊंडेशन प्राणीमित्र वेल्फेअर सोसायटीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू झाला होता, तसेच मृत कासवाची विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित व्यक्तीने कुठलीही दक्षता घेतली नाही, अशी माहिती या प्राणीमित्र संघटनेला सफाई कामगार आणि सुरक्षारक्षकांकडून देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे संस्थेने कापुरबावडी पोलीस ठाण्यात मालकाविरोधात तक्रार दिली होती.