ठाणे :लम्पी आजारामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या यात्रेवर (Mhasa Fair At Thane) सावट होते. ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर स्थानिक आमदारांनी राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या म्हसा यात्रेला ६ जानेवारी सुरुवात होऊन हि जत्रा भरणार असल्याने जनावरांचा बाजारात राज्यभरातून लाखो शेतकरी खरेदी विकीसाठी येत असतात. दरवर्षी पौष पौर्णिमेला या जत्रेची (Animal Fair Murbad) सुरुवात होते. (Buying and selling of animals) दरवर्षी राज्यभरातून २० ते २२ लाख भाविक या जत्रेला भेट देतात. म्हशा गावातील पुरातन असलेल्या खांबलिंगेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (turnover of crores in sale of animals) यामुळे मंदिरात दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. (Latest news from Thane)
बैलबाजार ठरतेय जत्रेचे वैशिष्ट्य :जत्रेतला बैलबाजार हे या जत्रेचं प्रमुख वैशिष्ट्य असून येथे २५ हजारांपासून ते अगदी २ लाख रुपयांपर्यंतचे विविध प्रजातींचे बैल विक्रीसाठी आणले जातात. शिवाय बांबूच्या टोपल्या, झाडाच्या खोडापासून तयार केलेला उखळ, कोयते, कुदळ, विळे असं शेतीला उपयोगी पडणारं साहित्यही जत्रेत मिळतं. तर आकाश पाळणे, विविध खेळ यांच्यासह इथला घोंगडी बाजारही प्रसिद्ध आहे. म्हशाच्या जत्रेत मिळणारे हातोळी खाजा, गुलाबजामुन हे गोड पदार्थही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. १५ दिवस चालणाऱ्या या जत्रेला मुंबई, नगर, नाशिक , ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील लाखो भाविक आवर्जून भेट देतात.