ठाणे :दोन वर्षाच्या कोरोना संकटांनंतर यंदा सर्व सण उत्सव उत्साहात साजरे ( festivals are celebrated with enthusiasm) होत आहेत. दिवाळीनंतर उत्सुकता लागते ती म्हणजे तुलसी विवाहाची, शहरी भागात याच तुलसी विवाहाची लगबग कमी प्रमाणात पाहायला मिळते. आजकाल धावत्या जगता सण उत्सवाचे मखर आणि इतर गोष्टी रेडिमेड आणि पर्यावरणाला हाणिकाराक असतात. आजकालच्या व्यस्त जीवनात मोठ्या प्रमाणात नागरिक याच वस्तुंना प्राधान्य देतात. तर दुसरीकडे एक वेगळा संदेश देत ठाण्यातील मायलेकींनी पूर्णपणे इकोफ्रेंडली तुसली विवाह साजरा केला आहे. ( Eco friendly Tusli vivah )
Tulsi vivah : मायलेकींची अनोखी संकल्पना; पर्यावरणपूरक साजरा केला तुलसी विवाह - Tulsi vivah celebrated
दोन वर्षाच्या कोरोना संकटांनंतर यंदा सर्व सण उत्सव उत्साहात साजरे ( festivals are celebrated with enthusiasm) होत आहेत.आजकालच्या व्यस्त जीवनात मोठ्या प्रमाणात नागरिक याच वस्तुंना प्राधान्य देतात. तर दुसरीकडे एक वेगळा संदेश देत ठाण्यातील मायलेकींनी पूर्णपणे इकोफ्रेंडली तुसली विवाह साजरा केला आहे.
इको फ्रेंडली पद्धतीने सजावट :ग्रामीण भागात तुलसी विवाह पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरात देखील तुलसी विवाह केला जात आहे. कागदी मंडप, कागदी पायघड्या अशा प्रकारे इको फ्रेंडली पद्धतीने सजावट करण्यात आली होती. पारंपरिक सण आजच्या पिढी मध्ये रुजताना दिसून येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल. मोबाईलमुळे आजकालची पिढी या अशा पारंपरिक सणांकडे दुर्लक्ष करत आहे. आजकालच्या पिढीला देखील या सणाचे महत्व पटावे यासाठी हा उत्सव साजरा करत असल्याचे सुमुख राजे यांनी सांगितले. तर मुलांना या सणांमध्ये जबाबदारी दिली तर ते उत्कृष्ट पद्धतीने पार पडतात असे देखील राजे एन्की सांगितले. संपूर्ण सजावट ही कृत्रिम वस्तूंचा वापर न करता केली आहे लहाननपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या उत्सवात सहभागी झाल्याने खूप आनंद आहे असे गौरी राजे यांनी सांगितले.
तुळशी विवाहाची पद्धत : घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची - गेरू किंवा विविध रंगांनी रंगरंगोटी केली जाते. बोर, चिंच, आवळा, सिताफळ ठेवतात. कुटुंबातील कर्ता पुरूष किंवा पंडितांना बोलावून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतात. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात, मांडव म्हणून उसाची खोपटी करतात. त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक ( Tulsi Vivah Ritual ) निघते.