ठाणे - मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा येथे कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा भीषण अपघात होऊन ट्रकचा चक्काचूर झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ट्रक उलटण्यापूर्वीच प्रसंगावधान राखत चालक व मदतनीसाने ट्रकमधून उड्या मारल्याने त्यांचे प्राण बचावले आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
चारचाकीला वाचवताना उलटला ट्रक, मुंबई-नाशिक महामार्गावरील घटना - Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा येथे कारला वाचविण्याच्या नादात ट्रकचा भीषण अपघात होऊन ट्रकचा चक्काचूर झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ट्रक उलटण्यापूर्वीच प्रसंगावधान राखत चालक व मदतनीसाने ट्रकमधून उड्या मारल्याने त्यांचे प्राण बचावले आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
अपघातग्रस्त ट्रक मंगळवारी (दि. 31 मे) सकाळच्या सुमारास नवी मुंबई तुर्भे येथून डिस्टिक वॉटरचे ड्रम घेऊन भिवंडीतील एका गोदामात निघाला होता. त्याच सुमाराला ट्रक मुंबई-नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा येथे आला असता एका कारला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ड्रमने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. ट्रक उलटताना चालक व मतदनिसाने प्रसंगावधान राखत उड्या मारल्याने ते बचावले आहेत. मात्र, या अपघातात ट्रकचा चक्काचूर होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे. भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांचे पथक व अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा -Unauthorized schools : ठाणे ग्रामीण भागात आढळल्या ३८ प्राथमिक शाळा अनधिकृत