ठाणे - औरंगाबादहून उल्हासनगरात १९ टन मैदा घेऊन आलेल्या ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे धावत्या ट्रकचा सेन्ट्रल बोल्ट तुटल्याने हा ट्रक रस्त्यावर पलटी होता होता बचावल्याने दुर्घटना टळली आहे.
उल्हासनगरात १९ टन मैदा घेऊन येणारा ट्रक उलटला - thane accident news
आज दुपारपर्यंत हा ट्रक त्या रहदारीच्या रस्त्यावर झुकलेल्या स्थितीत उभा असल्यामुळे त्या रस्त्यावरून जाणारे अतिआवश्यक सेवेतील वाहन चालक या ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते.
![उल्हासनगरात १९ टन मैदा घेऊन येणारा ट्रक उलटला thane accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6809572-868-6809572-1587014055245.jpg)
औरंगाबादहून एक ट्रक १९ टन मैदा घेऊन उल्हासनगरात निघाला होता. हा ट्रक आज पहाटेच्या सुमारास उल्हासनगर मधील कॅम्प नं ३ येथील टाऊन हॉल जवळील रस्त्यावरून भरधाव जात होता. त्यावेळी या ट्रकचा सेन्ट्रल बोल्ट अचानक तुटल्याने तो ट्रक पल्टी होता होता वाचला. या ट्रकमध्ये १९ टन मैदा असल्यामुळे तो लोडेड ट्रक झुकलेल्या अवस्थेत रस्त्यावर जागीच उभा राहीला. जर हा ट्रक पलटी झाला असता तर मोठी र्दुघटना घडली असती, मात्र प्रसंग टळला.
दरम्यान, आज दुपारपर्यंत हा ट्रक त्या रहदारीच्या रस्त्यावर झुकलेल्या स्थितीत उभा असल्यामुळे त्या रस्त्यावरून जाणारे अतिआवश्यक सेवेतील वाहन चालक या ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते.