महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीनं केली पत्नीची हत्या; दोन चिमुरड्यांनाही संपवलं

Triple Murder in Thane : ठाण्यातील कासारवडवली भागात धक्कादायक घटना घडलीय. दारुच्या नशेत पतीनं आपली बायको आणि 2 लहान मुलांची हत्या केलीय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 10:27 PM IST

अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त ठाणे

ठाणे Triple Murder in Thane : तिहेरी हत्याकांडानं ठाणे जिल्ह्यात खळबळ उडालीय. पतीनं आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतलाय. जिल्ह्यातील कासारवडवली इथं ही धक्कादायक घटना घडलीय. मागील तीन दिवसांपासून आरोपी त्याच्या भावाकडं राहत होता. 29 वर्षीय आरोपीनं बायको आणि दोन मुलांना संपवलं. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येनंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

घरगुती कारणामुळं हत्या : आरोपी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर इथला आहे. तो तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात भावाकडं राहत होता. त्याला दारुचं व्यसन होतं. तो कोणताही व्यावसाय करत नव्हता. प्राथमिक महितीमधून घरगुती कारणामुळं हत्या झाल्याचं समोर आलंय. 29 वर्षीय आरोपीनं आपल्या 24 वर्षीय पत्नीला संपवलं. त्यानंतर सहा वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलालाही संपवलंय.

आरोपीला दारुचं व्यसन : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा सख्खा भाऊ ठाण्यातील साईनगर कासारवडवली इथं राहतो. त्याच्याकडं तो 2 वर्षे राहिला होता. त्यानंतर कासारवडवली गावात गेल्या 7 वर्षांपासून राहत आहे. मयत व्यक्ती या आरोपीची पत्नी आणि मुलं आहेत. आरोपीला दारु पिण्याचं प्रचंड व्यसन होतं. त्यामुळं पत्नी आणि त्यांच्यात वारंवार भांडणं होतं होती. दारुच्या व्यसनामुळं ती त्याला सोडून राहत होती.

आरोपी तीन दिवसांपूर्वी आला भेटायला : मयत पत्नी ही लहान दिरासोबत तिच्या दोन मुलांसोबत वास्तव्यास होती. गेल्या तीन दिवसांपासून आरोपी त्याच्या पत्नी आणि दोन मुलांना भेटण्यासाठी घरी आला होता. आज सकाळी आरोपीचा भाऊ हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्यानंतर सुमारे साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात त्याची महिला आणि दोन्ही मुलं ही मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सात वर्षानंतर दुसरं कौटुंबिक हत्याकांड :28 फेब्रुवारी 2016 ला याच कासारवडवली परिसरात मध्यरात्री मृत्यूचं तांडव झालं होतं. एका विकृतानं कुटुंबातील आई, वडील, पत्नी मुलासह अन्य नातेवाईक अशा 14 जणांची हत्या केल्याचा थरार घडला होता. त्या घटनेत आरोपीची बहीण ही एकमेव जिवंत राहिली असल्यानं मृत्यूचं तांडव जगासमोर आलं होतं. यात 7 लहान मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. यानंतर 14 खुनानंतर आरोपी हसनैन वारेकर यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यानं कासारवडवली गावात खळबळ उडालीय.

हेही वाचा :

  1. वैजापूर तालुक्यात दारूच्या नशेत युवकाचा ८५ वर्षीय आजीवर बलात्कार करुन खून
  2. अपमानास्पद वागणुकीचा राग; घरजावायानं पत्नीसह सासरच्या पाच जणांना संपवलं; यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार

ABOUT THE AUTHOR

...view details