ठाणे -भिवंडीत आठ किलो गांजासह तिघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल उर्फ बबलू इब्राहिम पिंजारी ( वय ३१ रा .अहमदनगर ) राहुल उर्फ सैराट आण्णा रहिले ( वय २७ रा. डोंबिवली पूर्व ) राजेंद्र आण्णा माळी ( वय २६ रा. डोंबिवली ) असे गांजा प्रकरणी अटक केलेल्या त्रिकुटाचे नावे आहेत. यांच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून तस्कर त्रिकूटाला अटक-
नाशिक येथून भिवंडीत विक्रीसाठी अवैध गांजा घेऊन येणार असल्याची खबर कोनगाव पोलीस आणि कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना लागली होती. या माहितीच्या आधारे मंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी बायपास येथील बासुरी हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून तस्कर त्रिकूटाला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किंमतीचा आठ किलो गांजा व तीन मोबाईल, असा एकूण एक लाख ७६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एम शेणवी करीत आहेत.
परवा कल्याणमध्ये तर काल उल्हासनगरात गांजा तस्करावर झडप-