ठाणे -माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी २४ ऑगस्टला निधन झाले आहे. जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. ९ ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटलींना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जेटलींच्या जाण्याने देशात कधीही भरून न येणारी पोकळी - खासदार राजन विचारे - MP rajan vichare
एक अत्यंत हुशार, अभ्यासू आणि उमद्या व्यक्तिमत्वाला देश मुकला असल्याची भावना विचारेंनी व्यक्त केली. अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री असताना आपण त्यांना विविध लोकोपयोगी कामांसाठी भेटत होतो. तेव्हा ते अत्यंत सकारात्मक उत्तर देऊन आपल्या रास्त मागण्या मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी सकाळी दुःखद निधन झाले. जेटलींच्या निधनाने देशावर दुःखाची छाया पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज यांचे अकाली निधन झाले होते. या धक्क्यातून सत्ताधारी भाजप आणि देश सावरत असतानाच जेटली यांच्या निधनाची बातमी आली. जेटलींच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी श्रद्धांजली वाहिली. एक अत्यंत हुशार, अभ्यासू आणि उमद्या व्यक्तिमत्वाला देश मुकला असल्याची भावना विचारेंनी व्यक्त केली. अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री असताना आपण त्यांना विविध लोकोपयोगी कामांसाठी भेटत होतो. तेव्हा ते अत्यंत सकारात्मक उत्तर देऊन आपल्या रास्त मागण्या मान्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. कळवा ऐरोली या एलेव्हेटेड रस्त्याची मागणी आपण करताच त्यांनी ती लगेच मान्य केल्याची आठवण देखील विचारेंनी सांगितली.