ठाणे - वादळी पावसामुळे ठाण्यात मोठा अनर्थ टळला. मात्र, गुरुवारी ठाण्यातील पाचपाखाडी येथे एक मोठे झाड वादळी पावसामुळे रस्त्यावर कोसळले. याच वेळेस रस्त्यावरून धावत असलेल्या दोन वाहने झाडाच्या खाली आल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक रिक्षा आणि एक तीनचाकी मालवाहतूक गाडीचा यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड कापून रस्ता मोकळा केला आहे.
ठाण्यामध्ये वादळी पावसात रिक्षावर कोसळले झाड; जीवितहानी नाही
निसर्ग चक्रीवादळामुळे (3 जून) ठाण्यात जोरादार वाऱ्यासह पाऊस पडला. गुरुवारी (4 जून) ठाण्यात पावसाचा जोर बुधवारपेक्षा कमी होता. मात्र, ठाण्यात निसर्ग वादळामुळे झाडांची मुळे खिळखिळी झाली होती. तीच झाडे आता वाऱ्यामुळे पडत आहेत.
निसर्ग वादळामुळे (3 जून) ठाण्यात जोरादार वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारी (4 जून) ठाण्यात पावसाचा जोर कालपेक्षा कमी होता. मात्र, ठाण्यात निसर्ग वादळामुळे झाडांची मुळे खिळखिळी झाली होती. तीच झाडे गुरुवारी वाऱ्यामुळे पडत आहेत. यामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. ठाण्यातील जांभळी नाका येथील विठ्ठल मंदिराजवळ एक मोठे झाड एका घरावर कोसळले. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. आहे ठाणे आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले असून, झाड घरावरून काढले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वागळे इस्टेट, कोपरी, नौपाडा, नितिन कंपणी, घोडबंदर, जांभळी नाका या भागात पावसाचा जोर बुधवारी सकाळपासूनच कायम आहे. तर कळवा खारेगाव रोडवर एक मोठे झाड रस्त्यावरच उन्मळून पडल्याने कळवा खारेगाव रोडवर वाहतूक कोंडी झाली. घोडबंदर रोडवरील आर माॅलजवळ रस्त्यावर पाणी तुंबले आहे. हे पाणी संपूर्ण रस्तावर तुंबल्याने तेथून जाणाऱ्या गाड्यांना रस्त्याचा अंदाज येत नाही. तर रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे बॅरेगेंटीग असल्याने अगदी काही फुट जागेतून मार्ग काढत गाडी काढावी लागते आहे.