ठाणे - शहरात मुसळधार झालेल्या पावसामुळे दोन ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत १ जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विष्णू सोळंकी असे मृताचे नाव आहे.
ठाण्यात मुसळधार पावसामुळे दोन ठिकाणी झाड कोसळले; १ ठार, दोघे जखमी - Riksha Stand
ठाण्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे दोन ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये १ ठार तर दोघ गंभीर जखमी झाले आहेत.
पहिली घटना ठाण्याच्या अंबरनाथमधील शिवाजी चौकातील रिक्षा स्टँडजवळ घडली. याठिकाणी मोठ्या झाडासोबत विजेचा खांबही कोसळला. त्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारांमधून वीजप्रवाह रिक्षावर उतरल्याने रिक्षाचालक सोळंकीचा मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांनाही विजेचा शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, जखमींवर उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सोळंकी यांचा मृतदेह सकाळी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुसऱ्या घटनेत झाड इमारतीवर कोसळली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.