ठाणे (नवी मुंबई)-शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ऐरोलीतील सेक्टर 15 येथे असलेल्या दक्षिण सोसायटीच्या आवारातील जुने झाड कोसळले. पहाटेची वेळ असल्याने जिवीतहानी टळली.
मुसळधार पावसामुळे ऐरोलीत महाकाय झाड कोसळले
48 तासांत कोकण तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण, नवी मुंबईत शनीवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडी आहेत.
48 तासांत कोकण तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण, नवी मुंबईत शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. ऐरोलीतल्या सेक्टर 15, दक्षिण सोसायटीच्या आवारात असलेले मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने ऐरोली-पाटणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. याच ठिकाणी आणखी एका जागी झाड उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतुकीसाठी अडसर निर्माण झाला आहे. अग्निशामक दलाचे जवान कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम करत आहेत.