महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! शाप दिला म्हणून तृतीयपंथीयाची हत्या.. प्रियकराला अटक

आरोपी सुशील भालेरावसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी दोघात वाद झाल्यानंतर मृत रेखा हिने प्रियकर सुशीलला शाप दिला. या श्रापाच्या भीतीने सुशीलने रेखाची हत्या केल्याचे पोलीस तपासादरम्यान उघड झाले

By

Published : May 21, 2019, 7:08 PM IST

धक्कादायक! शाप दिला म्हणून तृतीयपंथीयाची हत्या.. प्रियकराला अटक

ठाणे- कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुशील भालेराव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रेखा देसाई उर्फ रेवा असे मृत तृतीयपंथीयाचे नाव असून आरोपी सुशील भालेरावसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी दोघात वाद झाल्यानंतर मृत रेखा हिने प्रियकर सुशीलला शाप दिला. या श्रापाच्या भीतीने सुशीलने रेखाची हत्या केल्याचे पोलीस तपासादरम्यान उघड झाले आहे.

धक्कादायक! शाप दिला म्हणून तृतीयपंथीयाची हत्या.. प्रियकराला अटक

कल्याण पूर्व काटेमानवली आंबेडकर चौक शिवसह्याद्री कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणारा रेखा देसाई उर्फ रेवा हा तृतीयपंथीय असून त्याच्यावर मुंब्रा परिसरात राहणाऱ्या सुशील भालेराव या तरुणाचे प्रेम होते. मृत रेखा देसाई उर्फ रेवा याचे घर दोन दिवसांपासून बंद होते. घराच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरली होती. यामुळे शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी रात्रीच्या सुमाराला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घर उघडले. तेव्हा रेखा याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करीत हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला.

धक्कादायक! शाप दिला म्हणून तृतीयपंथीयाची हत्या.. प्रियकराला अटक

दरम्यान, मृतक रेखासोबत सुशील नावाचा तरुण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. रेखाच्या हत्येनंतर सुशील पसार झाल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ मुंब्रा पोलिसांच्या साहाय्याने सुशीलला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. सुशीलने काही दिवसांपूर्वी त्याचा आणि रेखाचा वाद झाला होता. या वादानंतर रेखाने तुझी आजारी असलेल्या बहिणीचा मृत्यू झाला. तसेच तुझ्या घरातील सर्व लोक मरतील असा शाप दिला होता. काही दिवसांपूर्वी सुशीलची आजारी असलेल्या बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंब मरणार अशी भीती सुशीलला वाटत होती. याच भीतीतून सुशीलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details