महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद ! वाहतूक पोलिसांनी बुजवला रस्त्यावरील खड्डा

सरकारी यंत्रणेची वाट न बघता वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेऊन, कळवा खारेगाव रेल्वे क्राॅसिंगदरम्यान पडलेला खड्डा बुजवला आहे. या खड्ड्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलीस कर्मचारी परेश शेळके, पी. एन. काळे आणि पी. सी. पठाण यांनी हा खड्डा बुजवला आहे.

वाहतूक पोलिसांनी बुजवला रस्त्यावरील खड्डा
वाहतूक पोलिसांनी बुजवला रस्त्यावरील खड्डा

By

Published : Jun 14, 2021, 8:45 PM IST

ठाणे -सरकारी यंत्रणेची वाट न बघता वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेऊन, कळवा खारेगाव रेल्वे क्राॅसिंगदरम्यान पडलेला खड्डा बुजवला आहे. या खड्ड्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलीस कर्मचारी परेश शेळके, पी. एन. काळे आणि पी. सी. पठाण यांनी हा खड्डा बुजवला आहे.

विशेष म्हणजे वाहतूक पोलीस रस्त्यावरचा खड्डा बुजवत असताना त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही, बघ्यांनी याचे चित्रकरण करून व्हिडिओ व्हायरल केले. या खड्ड्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो, एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव ठेवून या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा खड्डा बुजवला.

वाहतूक पोलिसांनी बुजवला रस्त्यावरील खड्डा

खड्ड्यांचा त्रास पोलिसांनाही

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास जसा सर्वसामान्य नागरिकांना होतो, तसाच तो वाहतूक पोलिसांना देखील होतो. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धिमी होते. वाहतूक धिमी झाल्यामुळे वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना त्रास होतो. त्यामुळे अनेक वेळा पोलीस स्व:ताच पुढाकार घेऊन, खड्डे बुजवताना दिसून येतात. जर अशाच प्रकारची भावना समाजातल्या सगळ्याच घटकांनी ठेवली, तर सर्वसामान्य नागरिकांचे जगणे हे सुखकर होऊ शकते, हेच या कामावरून दिसून येत आहे.

हेही वाचा -12 विधानपरिषद सदस्यांच्या यादी उपलब्धतेबाबत राजभवन सचिवालयात फैसला करणार!

ABOUT THE AUTHOR

...view details