महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात मुजोर टॅक्सीचालकाला वाहतूक पोलिसांचा 'प्रसाद'

वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, ठाणे स्थानकाच्याबाहेरील वाहतूक पोलिसांची चौकी दुसरीकडे सुरू करण्यात आल्यामुळे वाहतूक पोलीस नसले की या रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी वाढते. त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसतो.

ठाणे

By

Published : Jun 19, 2019, 12:22 PM IST

Updated : Jun 19, 2019, 12:41 PM IST

ठाणे- पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीचा त्रास आता ठाणेकरांसह पोलिसांनादेखील होऊ लागला आहे. असाच एक प्रकार आज सकाळी सॅटिस उड्डाण पुलाखाली घडला. एक टॅक्सीचालक थेट उड्डाण पुलाखाली टॅक्सी लावून रेल्वे स्थानकात भाडे घेण्यास गेला. ज्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसांनी टॅक्सीचालकाला गाडी काढण्यास सांगितले असता तो पोलिसांनाच उलट सुलट उत्तर देऊ लागला. हा प्रकार रोजच होत असल्याचे समजताच वाहतूक पोलिसांचा बांध फुटला. त्या मुजोर टॅक्सीचालकाला पोलिसांनी चोप दिला.

ठाण्यात मुजोर टॅक्सीचालकाला पोलिसांचा 'प्रसाद'

हा मुजोरपणा रोज होत असल्याचे समजताच वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या टॅक्सीचालकाला चांगलाच चोप दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांनाच टार्गेट करण्यात येत होते. मात्र, जेव्हा खरी कहाणी समोर आली तेव्हा मात्र पोलिसांचे कौतुक होऊ लागले.

सॅटीस उड्डाण पुलाखाली रिक्षा आणि टॅक्सी रांगेशिवाय लावण्यास मनाई असतानाही सर्रास रिक्षा, टॅक्सी लावल्या जातात. त्यामुळे याचा त्रास पोलिसांसह ठाणेकरांनाही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच आज वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांचा बांध तुटला आणि टॅक्सीचालकाला चांगलाच प्रसाद मिळाला. स्थानकाबाहेर अवैध रिक्षावाले भाडे भरतात आणि नंतर प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे घेतात किंवा त्यांना लूटतातही. पोलीस वारंवार आवाहन करून देखील प्रवासी मात्र अशा अवैध वाहनांतूनच प्रवास करतात.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, ठाणे स्थानकाच्याबाहेरील वाहतूक पोलिसांची चौकी दुसरीकडे सुरू करण्यात आल्यामुळे वाहतूक पोलीस नसले की या रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी वाढते. त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसतो.

Last Updated : Jun 19, 2019, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details