महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे 'दंड' झाला उदंड;  वसुली ८ कोटीवर - ठाणे पोलीस

वाहतूक पोलीस यंत्रणा जागरुक झाल्यानंतर सुरू केलेल्या कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालकांवर कोणताही वाद न घातला त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. कारवाईचे प्रमाण वाढले असून ठाणे पोलीस आयुक्तालयात 11 महिन्यात 7 लाख वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Traffic police action raises penalties
वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे दंड झाला उदंड

By

Published : Dec 22, 2019, 2:50 PM IST

ठाणे - वाहतूक पोलीस यंत्रणा जागरुक झाल्यानंतर सुरू केलेल्या कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालकांवर कोणताही वाद न घातला त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. कारवाईचे प्रमाण वाढले असून ठाणे पोलीस आयुक्तालयात 11 महिन्यात 7 लाख वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या उत्पन्नात वाढ देखील झाली आहे. या कारवाईमुळे भ्रष्टाचार देखील कमी झाला असून कारवाई झालेल्या वाहन चालकांना घर बसल्या दंड भरण्याची सोय करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे दंड झाला उदंड

हेही वाचा - पाहा कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय शेतकरी नेत्यांना?

ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलीस यंत्रणा हायटेक झाल्यामुळे कोणताही वाद उद्भवत नाही. शिवाय कारवाईचा पुरावा देखील उपलब्ध असतो. त्यामुळे वाद टळल्याने सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे देखील कमी होत आहेत. ठाण्यात मागील अकरा महिन्यात वाहतूक पोलिसांनी 7 लाख 27 हजार 330 वाहनांवर कारवाई करत 8 कोटी 2 लाख 94 हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई नो पार्किंगची झाली आहे. 1 लाख 8 हजार 791 हजार वाहनांवर कारवाई केली आहे. दुसर्‍या क्रमांकावर रोडपार्किंग असून यामध्ये 73 हजार 155 वाहनांवर कारवाई केली आहे. 49 हजार 314 विना हेल्मेट वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कारवाईमुळे नो पार्किंगची समस्या समोर आली असून सर्वात जास्त दंड नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याचे आहेत. यामुळे वाहन चालकांनी देखील आधी सुविधा द्या आणि मग कारवाई करा, अशी मागणी सुरू केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात नियोजित शहरे येत नसल्यामुळे पार्किंगचा अभाव दिसत आहे. त्यासोबत दुचाकी स्वार अजूनही हेल्मेटसक्ती नंतरही हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -'हिंदू महासभा-मुस्लीम लीग हे तर ब्रिटिशांचे चमचे'

ABOUT THE AUTHOR

...view details