ठाणे -कार डेकोर व्यवसाय असलेल्या मनसुख हिरेन यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. जैन समाजातदेखील त्यांना मोठा मान दिला जात होता. याचा प्रत्यय आज ठाण्यात आला. हिरेन यांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत त्यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा -राज्य अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७,५०० कोटींची तरतूद
आज दुपारी मनसुख यांच्या घराजवळील जैन समाजाच्या सभागृहात मनसुख हिरेन यांची शोकसभा आयजित करण्यात आली होती. यात हजारो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.