महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टोईंग कर्मचाऱ्यांनी केलं दुचाकीचं नुकसान, फेसबुकवर पोस्ट लिहून दुचाकी मालकाने व्यक्त केली नाराजी

संदीप मोरे यांनी कल्याणच्या रामदेव हॉटेल परिसरात त्यांची दुचाकी पार्क केली होती. मात्र, ही दुचाकी टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी उचलून नेली. त्यानंतर संदीप दुचाकी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या दुर्गाडी माता चौकातील कार्यलयात गेले. तेव्हा दुचाकीची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या दुचाकीवर अनेक ठिकाणी स्क्रॅच पडले होते.

टोईंग कर्मचाऱ्यांनी केलं दुचाकीचं नुकसान, फेसबुकवर पोस्ट लिहून दुचाकी मालकाने व्यक्त केली नाराजी

By

Published : May 12, 2019, 5:05 PM IST

ठाणे - संदीप मोरे यांनी कल्याणच्या रामदेव हॉटेल परिसरात दुचाकी उभी केली होती. ही दुचाकी टोईंग कर्मऱ्यानी उचलून नेली. संदीप दुचाकी सोडवण्यासाठी गेले असता टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी दुचाकीचे नुकसान केल्याचे दिसले. त्यांनी वाहतूक पोलीस आणि टोईंग कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दुचाकीच्या मालकावरच अरेरावी केल्याचा प्रकार समोर आल आहे. या घटनेमुळे दुचाकी मालकाने वाहतूक पोलिसांच्या हेकेखोरपणावर नाराजी व्यक्त करत फेसबुकवर पोस्ट व्हायरल केली.

टोईंग कर्मचाऱ्यांनी केलं दुचाकीचं नुकसान, फेसबुकवर पोस्ट लिहून दुचाकी मालकाने व्यक्त केली नाराजी

संदीप मोरे यांनी कल्याणच्या रामदेव हॉटेल परिसरात त्यांची दुचाकी पार्क केली होती. मात्र, ही दुचाकी टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी उचलून नेली. त्यानंतर संदीप दुचाकी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या दुर्गाडी माता चौकातील कार्यलयात गेले. तेव्हा दुचाकीची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या दुचाकीवर अनेक ठिकाणी स्क्रॅच पडले होते. तसेच दुचाकीच्या पुढे असलेले गार्डही तोडून ठेवण्यात आले होते. इतरही अनेक ठिकाणी गाडीचे नुकसान झाले होते. यामुळे संदीप यांनी वाहतूक पोलीस आणि टोईंग कर्मचाऱ्यांना दुचाकीच्या नुकसानाचा जाब विचारला असता, वाहतूक पोलिसांनी उडवाउडवीची उत्तर देत थेट इन्शुरन्स क्लेम करण्यास सांगितले. यामुळे उद्विग्न झालेल्या संदीप यांनी थेट फेसबुकवर दुचाकीचे फोटो टाकत व्यथा मांडली.

वाहतूक पोलिसांनी मात्र आम्ही असे कुठलेही नुकसान केले नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. चौकशी करून गाडीचे नुकसान झाले असेल, तर टोईंग कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू, असे आश्वासन वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिले आहे. मात्र,या घटनेमुळे टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details