महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंदूत्वादी सरकार येऊनही हिंदूंवरील अत्याचार कमी झाले नाहीत - हिंदू जनजागृती समिती

गेल्या 70 वर्षा अनेक सरकारे आली आणि गेली, गेल्या ५ वर्षापासून हिंदूत्वादी भाजप सरकार देशात सत्तेवर आले आहे, मात्र हिंदूवरील अत्याचारात वाढ झाले आहेत. सरकार कोणतेही असो हिंदूंच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

By

Published : Feb 2, 2019, 9:38 AM IST

hindu

ठाणे - गेल्या 70 वर्षा अनेक सरकारे आली आणि गेली. गेल्या ५ वर्षापासून हिंदूवादी भाजप सरकार देशात सत्तेवर आले आहे, मात्र हिंदूवरील अत्याचारात वाढ झाले आहे. सरकार कोणतेही असो हिंदूंच्या मागण्या मान्य झाले नाही. हिंदुंनी संघटित होऊन हिंदूराष्ट्राची मागणी करणे ही काळाची गरज असल्याचे मत, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले. ते कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या 70 वर्षात या देशातील नागरिकांना धर्मनिरपेक्षतेच्या नावाने फसवण्यात येत आहे. हिंदू हा धर्मनिरपेक्ष, धर्मनिष्ठ, धर्मचरणी, धर्मनिरपेक्ष सेक्युलर असे म्हणत दिशाभूल करून फसवण्यात आले आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचे म्हटले, या पत्रकार परिषदेत अॅड. विवेक भावे अॅड. दीक्षा पेडभांजे उपस्थित होते.


दरम्यान दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गोहत्या, लव जिहाद, धर्मांतर अशा हिंदूतत्त्वनिष्ठावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने रविवारी ३ फेब्रुवारीला राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही सभा कल्याण पश्चिम परिसरात संतोषी माता मंदिर रोडवरील यशवंतराव चव्हाण मैदानात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सभेला परिषदेचे अभिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदू जनजागृतीचे सुमित सागवेकर सनातन संस्थेच्या डॉक्टर दिक्षा पेडभांजे लष्कर हिंदीचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर प्रसाद खंडेलवाल सभेला संबोधित करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details