महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेव्हा सावलीही सोडते आपली साथ, उद्या ठाण्यात 'शून्य सावली' दिवस - manoj devkar

उद्या (शुक्रवारी) १७ मे रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी शुन्य सवालीचा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : May 16, 2019, 3:36 PM IST

मुंबई - आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, शुक्रवारी शुन्य सावलीचा दिवस असल्याने ठाणेकरांची सावली अदृश्य होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. उद्या (शुक्रवारी) १७ मे रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी शुन्य सवालीचा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.

माहिती देताना दा कृ. सोमण, खगोल अभ्यासक, जेष्ठ पंचांगकर्ते


याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर येतो. त्यामुळे आपल्याला आपली सावली दिसत नाही. हा अनुभव वर्षातून केवळ २ वेळा घेता येतो. आपण असतो त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्या दिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो, असाच अनुभव ठाणेकरांना उद्या अनुभवता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details