महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! नवी मुंबईत आज 95 रुग्ण बरे होऊन घरी परतले

दिवसेंदिवस नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संखया वाढत आहे. असे असताना आज एक दिलासादायक बातमी आली असून, आज 95 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

Navi Mumbai
नवी मुंबईत आज 95 रुग्ण बरे होऊन घरी परतले

By

Published : May 16, 2020, 9:50 PM IST

नवी मुंबई - दिवसेंदिवस नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संखया वाढत आहे. असे असताना आज एक दिलासादायक बातमी आली असून, आज 95 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्व रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आज नवी मुंबईत नवीन 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.


नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्रं दिसून येत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबईत आत्तापर्यंत 1 हजार 139 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 8 हजार 121 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 6 हजार 80 जण निगेटिव्ह आले असून, 913 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 128 इतकी आहे. आज नवीन 80 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तुर्भेमध्ये 14, बेलापूर 1, कोपरखैरणे 15, नेरुळ16 व वाशीत 11, घणसोली 22, ऐरोली 10 व दिघ्यात 6 असे एकूण 80 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आत्तापर्यंत नवी मुंबईत 367 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज नेरूळमधील 12, बेलापूरमधील 6, वाशीमधील 9, तुर्भेतील 25, कोपरखैरणे 15, घणसोली 7, ऐरोली 6 असे एकूण 95 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. शहरात सद्यस्थितीमध्ये 753 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details