ठाणे -कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या सहा दिवसांपासून झपाट्याने वाढत असून, गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 1 हजाराच्या पार झाली होती. तर आज शुक्रवारी 825 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान जोपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात येत नाही, तोपर्यंत कल्याण आणि डोंबिवलीमध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 74 हजारांच्या वर पोहोचली आहे.
आज 825 कोरोनाबाधितांची नोंद
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांनी 74 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज 845 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 392 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या 825 रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेत 136, कल्याण पश्चिम 255, डोंबिवली पूर्व 286, डोंबिवली पश्चिम 87, मांडा टिटवाळा 26, मोहने 29 तर पिसवली येथील 6 रुग्णांचा समावेश आहे.
शनिवार, रविवारी संचारबंदी आतापर्यंत एकूण 74 हजार 633 कोरोनाबाधितांची नोंद
आजच्या 825 कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे रुग्णांचा आकडा 74 हजार 633 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 66 हजार 323 जणांनी कोरोनावर मात केली असून, 1 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या शहरात 7 हजार 101 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.