ठाणे - कल्याण डोंबिवलीत आज (सोमवार) नव्याने कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडली राहणाऱ्या २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची नोंद पाहता कोरोना महापालिका हद्दीतील बाधितांचा आकडा ८०४ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यत २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नव्याने ३८ रुग्ण, एकूण संख्या ८०४ वर - kalyan dombivali latest news
कल्याण डोंबिवलीत आज (सोमवार) नव्याने कोरोनाचे ३८ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडली राहणाऱ्या २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे २७२ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या स्थितीत ५१० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ४ अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर आजही रुग्णामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण टिटवाळा परिसरात राहणारे आहेत. तर त्याखालोखाल डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्वेत भागात राहणारे आहेत. तर कल्याण पश्चिम परिसरात सर्वात कमी संख्या रुग्णांची आहे. मात्र डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्क येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.