महाराष्ट्र

maharashtra

भिवंडी शहरात २ तर ग्रामीणमध्ये ८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

By

Published : May 17, 2020, 8:40 PM IST

भिवंडी शहरात आज (रविवार) 2 तर ग्रामीण भागात 8 असे 10 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा 93 वर पोहोचला आहे.

bhivandi
भिवंडी शहरात २ तर ग्रामीणमध्ये ८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

ठाणे - भिवंडी शहरात आज (रविवार) 2 तर ग्रामीण भागात 8 असे 10 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 93वर पोहोचला असून, त्यापैकी 33 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाच मृत्यू झाला असून, सध्या 59 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कामतघर येथील 62 वर्षीय आंबा व्यापारी व आयजीएम कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हा तरुण कळवा रुग्णालयातील कर्मचारी आहे. या दोन नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 42वर पोहोचला असून आतापर्यंत शहरातील 19 रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील 22 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ग्रामीण भागातील दापोडे गावातील 35 वर्षीय तरुण व सुरई सारंगगाव येथील 29 वर्षीय तरुण हे दोघे एका कंपनीत कामाला होते. येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोनगावातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या चार जणांमध्ये 20 वर्षाचा तरुण तर 18 वर्ष, 23 वर्ष व 50 वर्ष वयोगटाच्या तीन महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर काल्हेर येथील 50 वर्षीय पुरुष तर पडघा खालींग येथील 31 वर्षीय तरुणाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघे जण मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.


आज ग्रामीण भागातील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भिवंडी ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 51वर पोहोचला आहे. त्यातील 14 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details