महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना: मुंबई व नवी मुंबई शहरात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिव्यात थर्मल गनद्वारे तपासणी - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची थर्मल गनने तपासणी

ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबई व नवी मुंबई शहरात येत जात असतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्या सर्वांची दिवा येथे थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

employee thermal test in diva
कर्मचाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी

By

Published : May 15, 2020, 7:53 AM IST

ठाणे- शहरातील दिवा प्रभाग समिती येथून मुंबई व नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या सर्वांची नॅशनल स्कुल, पोलीस चेक नाका, दिवा शीळ रोड येथे रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी

दिवा येथून मुंबई व नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी टिएमटी, खाजगी बस, कार, रिक्षाने जाणा-या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. दररोज येजा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून थर्मल गनद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई आणि नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची नॅशनल स्कूल, पोलीस चेक नाका, दिवा शीळ रोड येथे रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांची संपूर्ण माहिती नोंदवहीत घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details