महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Titwala Rape : टिटवाळा रेल्वेस्थानकाजवळ विवाहितेवर बलात्कार, एकाला अटक - Married rape

Titwala Rape : रेल्वे रुळाशेजारच्या पायवाटेनं जात असलेल्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.

Titwala Rape
Titwala Rape

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 8:32 PM IST

Updated : Nov 14, 2023, 11:03 PM IST

मनोज पाटील यांची प्रतिक्रिया

ठाणे Titwala Rape:एका धक्कादायक घटनेत, विवाहित महिला रेल्वेलगतच्या पायवाटेनं घरी जात असताना तिच्यावर एकानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं टिटवाळ्यात खळबळ उडाली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाच्या जवळ ही घटना घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. निशांत चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो भिवंडी तालुक्यातील पडघा गावच्या हद्दीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

विवाहितेवर बलात्कार : लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित असून ती कल्याण-कसारा रस्त्यावरील शहाड परिसरात एका खासगी कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणं 'ती' कंपनीतील काम संपवून सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरी जात होती. टिटवाळा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पीडित महिला घराकडं जात होती. त्यावेळी नराधमानं तिला झुडपात नेत तिच्यावर बलात्कार केला.

जीवे मारण्याची धमकी : विशेष म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी पीडिता पतीशी मोबाईलवर बोलत होती. त्यावेळी नराधमानं तिच्यावर अचानक हल्ला करून तिला ट्रॅकजवळील झुडपात नेलं. शिवाय बलात्काराच्या वेळी पीडितेचा मोबाईल सुरू असताना नराधमानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर नराधमानं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, नराधमाच्या धमकीला न घाबरता पीडितेनं घडलेला प्रकार पतीला सांगितला.

आरोपीला अटक : त्यानंतर पतीनं शेजाऱ्यासह तत्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही तासांतच नराधमाला अटक केली. या संदर्भात लोहमार्ग पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, या गुन्ह्यात आरोपी निशांत चव्हाणला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच आरोपी निशांत चव्हाण हा एका खासगी कंपनीत कामाला असल्याची त्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. Minor Girl Rape : १६ वर्षीय पोटच्या मुलीवर बापासह भावाने केला बलात्कार
  2. आदिवासी महिला बलात्कार व खून प्रकरण : आरोपींच्या अटकेसाठी भिवंडीत आक्रोश मोर्चा
  3. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार
Last Updated : Nov 14, 2023, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details