लघुशंकेच्या वादातून तरुणाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद - सीसीटीव्ही
भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंकेच्या वादातून ३ ते ४ जणांच्या टोळक्याने दोघा जणांना बेदम मारहाण केली. एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
THANE
ठाणे - भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंकेच्या वादातून ३ ते ४ जणांच्या टोळक्याने दोघा जणांना बेदम मारहाण केली. एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोध सुरू केला आहे.