महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवलीत बर्निंग कारचा थरार; आगीत जळून खाक

या कारने अचानक पेट घेवून क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. या आगीत काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली.

डोंबिवलीत बर्निंग कारचा थरार; आगीत जळून खाक

By

Published : Sep 22, 2019, 8:42 PM IST

ठाणे - शनिवारी डोंबिवलीत रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. डोंबिवली पूर्वेतील आगरकर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली. परिसरातील रहिवाश्यांनी ही आग विझवली. मात्र, तोपर्यंत लाखो रुपये किंमतीची कार आगीत जळून खाक झाली. कारला अचानक आग लागून क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले आणि यात कार जळून खाक झाली.

डोंबिवलीत बर्निंग कारचा थरार; आगीत कार जळून खाक

हे ही वाचा -व्हिडिओ : मुंबई-नाशिक महामार्गावर बर्निंग कारचा थरार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडे आगरकर रोडवर एक कार पार्क केली होती. या कारने अचानक पेट घेवून क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. या आगीत काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली. स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनेचे वृत्त कळताच काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात आली. बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीची समस्याही निर्माण झाली होती. या घटनेचे वृत्त ताजे असताना त्याचवेळी दुसरीकडे कल्याण-शिळ रोडवर आणखी एका कारला आग लागल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा -सागरी महामार्गावर 'द बर्निंग कार'चा थरार; सर्व प्रवासी सुखरुप

ABOUT THE AUTHOR

...view details