शहापूर (ठाणे) - एका मोहाच्या झाडाला तीन तरुणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आज (सोमवारी) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना तालुक्यातील खर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चांदे गावानजीकच्या जंगलात उघड झाली. नितीन भेरे (वय-३५, रा. शहापूर), महेंद्र दुभेले (वय-३०, रा. खर्डी) आणि मुकेश घावट (वय-२२, रा. चांदा, खर्डी) अशी मृतांची नावे आहेत.
ही घटना एका गुराख्याला आढळली. त्यांनतर घटनेची माहिती कळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तिघांचे मृतदेह विच्छेदनासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. मृतांमध्ये चांदा गावातील रहिवासी असलेले महेंद्र दुभेले आणि मुकेश घावट हे मामाभाचे आहे. तर शहापूरमध्ये राहणारा नितीन भेरे हा विवाहित होता.
हेही वाचा -कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांनाच महागात पडेल - आरोग्यमंत्री राजेश टोपे