ठाणे : भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून; या मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे भटक्या, मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या अनेक घटना शहरात घडत आहे. अश्यातच (Incidents at Padmanagar in Bhiwandi) पद्मानगर परिसरातील तीन वर्षीय चिमूरडीला (three year old girl) पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना (seriously injured in vicious dog attack) घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून; तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
In Dog Attack Girl Injured : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी, भिवंडीच्या पद्मानगरातील घटना
पद्मानगर परिसरातील (Incidents at Padmanagar in Bhiwandi) तीन वर्षीय चिमूरडीला (three year old girl) पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी (seriously injured in vicious dog attack) केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून; तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदनीकुमारी असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
चांदनीकुमारी असे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. भिवंडीतील पद्मानगर येथील राजुचाळ परिसरात सोमवारी खेळत असतांना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. पद्मानगर येथे मोठया प्रमाणात मोकाट, भटक्या प्राण्याचा सुळसुळाट पसरला आहे. मागील दोन महिन्यापासून राजुचाळ परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातलेले आहे. पिसाळलेला कुत्रा दिवसरात्र परिसरातील लहान मुले, शाळेतील विद्यार्थी महिला, जेष्ठ नागरीकांच्या अंगावर जावून चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरीकांना पिसाळलेल्या कुत्र्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पद्मानगर परिसरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांसह शहरातील सर्वच भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा मनपा प्रशासनाने योग्य तो लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तर यापुर्वी देखील भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे अनेक बालकांचा जीव गेल्याच्या घटना राजयात इतरत्र घडल्या आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाला याबाबत जाग आलेली दिसत नाही.