ठाणे - सीवेज ट्रीटमेंट प्लांटची साफसफाई करताना 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील ढोकली नाका परिसरातील सप्तश्री हाईटसमोर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांना बाहेर काढण्यात आले आहेत.
येथे एकूण 8 कर्मचारी सफाई करत होते. त्यातील 3 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. अमित पुहल (वय, 20 वर्षे), अमन बादल (वय, 21 वर्षे), अजय बुंबाक (वय, 24 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. 5 जणांना सुखरुप बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी मेट्रो हॉस्पिटल घोडबंदर रोड, ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदर सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या सफाई ठेकेदाराचे नाव अजय भगवान बागुल असे आहे.