नवी मुंबई - कोपरखैरणे येथील एका अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा कोपरखैरणे परिसरामध्ये बुधवारी पुन्हा दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यामध्ये एक तरुण व मध्यमवयीन व्यक्तीचा समावेश आहे.
नवी मुंबईत 2 दिवसात 3 आत्महत्या - koparkhairne suicide news
एकाच विभागातील 2 जणांनी आत्महत्या केली असून, 2 दिवसाआधी याच विभागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणानेदेखील आत्महत्या केली होती. मागील 2 दिवसात 3 जणांनी आत्महत्या केल्याने परिसर हादरून गेला आहे.
![नवी मुंबईत 2 दिवसात 3 आत्महत्या navi mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7188771-213-7188771-1589432271548.jpg)
नवी मुंबईत बुधवारी एकाच दिवशी 2 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघेही कोपरखैरणे सेक्टर 2 मधील रहिवासी आहेत. यातील शिवकुमार गुप्ता हा 31 वर्षीय रिक्षा चालक होता. टाळेबंदीमुळे त्यांचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला होता त्यातच त्याने कर्ज काढून नवी रिक्षा घेतली होती. त्यामुळे रिक्षाचे हफ्ते कसे भरायचे या तणावात त्याने सकाळी साडे नऊ च्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, 50 वर्षीय व्यक्तीला दारूचे व्यसन होते. दारू न मिळाल्याने त्याने त्याची पत्नी व मुले झोपल्यावर आपल्या तीन मजली घराच्या छतावरून उडी मारत आत्महत्या केली आहे.
विशेष म्हणजे एकाच विभागातील 2 जणांनी आत्महत्या केली असून, 2 दिवसाआधी याच विभागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणानेदेखील आत्महत्या केली होती. मागील 2 दिवसात 3 जणांनी आत्महत्या केल्याने परिसर हादरून गेला आहे. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलीस घटनास्थळी पोहचले. संबंधीत घटनांचा पुढील तपास पोलीस अधिकारी अभिजित मडके करत आहेत.