महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

नवी मुंबईतील वाशी परिसरात किरकोळ वादातून वैश्य कुटुंबातील दोन भाऊ व एका बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

भावंडावर कोयत्याने हल्ला
भावंडावर कोयत्याने हल्ला

By

Published : Apr 16, 2021, 5:46 PM IST

Updated : Apr 21, 2021, 1:10 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी परिसरात किरकोळ वादातून वैश्य कुटुंबातील दोन भाऊ व एका बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलीसांचा बोलण्यास नकार

काय आहे प्रकरण...

नवी मुंबई दोन कुटुंबांमधील वादाचे रूपांतर एक भ्याड हल्ल्यात झाले आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात तीन भावंडांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे

आईचे आर्त मनोगत

छेड काढल्याची तक्रार केल्याने हल्ला...

वैश्य कुटुंबातील मुलगी काजल हिची छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केला. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी श्रीनिवास अय्यरला ताब्यात घेतले आहे. तर इतर चार जण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. याविषयी कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात तर पोलिसांनी याविषयी बोलण्यास नकार दिलाय.

Last Updated : Apr 21, 2021, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details