ठाणे-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडी शहरासह ग्रामीण भागात वाढला होता. काही दिवसांपासून येथे कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, भिवंडी तालुक्यातील वडूनवघर या गावातील एका परिवारावर कोरोनाने घाला घातला आहे. एकाच परिवारातील तीन सदस्यांचा एका महिन्याच्या आत कोरोनाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
धक्कादायक...! महिन्याभरात कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू - thane corona update
भिवंडी तालुक्यामधील वडूनवघर या गावातील एका कुटुंबातील 3 सदस्यांचा एका महिन्याच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील ३ जणांच्या मृत्यूमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाणे कोरोना अपडेट
वडूनवघर गावातील एका कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा 25 जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. 25 जुलैनंतर 23 दिवसांनंतर या कुटुंबातील आणखी एका सदस्याचा मृत्यू झाला.
भिवंडी तालुक्यातील वडूनवघर गावातील या परिवारावर कोरोनाने घाला घातल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.