महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील लाभार्थ्यांना दिलासा; घराचे हप्ते भरण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ - cidco house installments news

कोरोनामुळे गेली दोन ते अडीच महिने लॉकडाउन सुरू होते. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले असून दिलेल्या मुदतीत हप्ते भरणे शक्य नाही. याबाबत राज्य सरकारने बुधवारी निर्णय घेतला असून हफ्ते भरण्यासाठी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.

cidco-houses-thane
सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील लाभार्थ्यांना दिलासा

By

Published : Jun 26, 2020, 8:45 AM IST

नवी मुंबई - ग्राहकांनी मागणी केल्यानुसार त्यांना घरांचे हफ्ते भरण्यास तीन महिन्यांची वाढीव मुदत राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील लाभार्थ्यांना दिलासा
अल्प आणि आर्थिकदृष्टया घटकांकरिता सिडको घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या भागात १४ हजार ८३८ घरे बांधत आहे. २ ऑक्टोबर २०१८ रोजी या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या घरांची खरेदी किंमत भरण्यासाठी सिडकोने लाभार्थ्यांना हफ्ते आखून दिले आहेत. हे हफ्ते भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२० अशी आहे. मात्र, कोरोनामुळे गेली दोन ते अडीच महिने लॉकडाउन सुरू होते. या काळात लाभार्थ्यांनी गृह कर्जासाठी बँकांकडे केलेल्या अर्जांंची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना कर्ज मिळालेले नाही. अनेकांच्या नोकर्‍या आणि रोजगार गेले आहेत. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत या सर्वांना दिलेल्या मुदतीत हफ्ते भरणे शक्य नाही. मुदतीत हफ्ते न भरल्याने मिळालेले हक्काचे घर हातून जाण्याची भिती या लाभार्थ्यांमध्ये होती. याबाबत बुधवारी राज्य सरकारने निर्णय घेतला असून हफ्ते भरण्यासाठी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details