ठाणे - महिन्याभरापासून ठाणे जिल्ह्यात विशेतः कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, आणि भिवंडी या शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच गेल्या २० दिवसात याच परिसरातील एका खासदारासह तीन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे कार्यकत्यांसह स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
ठाण्यात खासदारासह तीन आमदारांना कोरोनाची लागण - आमदारांना कोरोनाची लागण ठाणे
गेल्या वीस दिवसात भाजपचे २ आमदार व १ खासदार आणि शिवसेनाचा १ आमदार कुटुंबासह कोरोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे या तिन्ही आमदार आणि खासदारांनी लॉकडाऊनच्या काळात मतदारसंघात फिरुन गरजू नागरिकांना सर्वरुपी मदतीचा हात दिला होता.
दरम्यान, गेल्या वीस दिवसात भाजपचे २ आमदार व १ खासदार आणि शिवसेनाचा १ आमदार कुटुंबासह कोरोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे या तिन्ही आमदार आणि खासदारांनी लॉकडाऊनच्या काळात मतदारसंघात फिरून गरजू नागरिकांना सर्वरुपी मदतीचा हात दिला होता. तसेच दरदिवशी कार्यकत्याच्या भेटीसह महत्त्वाच्या प्रशासकीय बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, गेल्या २० दिवसांपासून त्यामध्ये खंड पडल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-मंत्र्यालाही पोलीस ठाण्यात घुसून मारणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेचा इतिहास...