महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : धक्कादायक! भिवंडीतून तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण, पोलिसांचा शोध सुरू

ठाणे जिल्ह्यात अपहरण घटनांमध्ये वाढ होत आहे. भिवंडीतील विविध भागातून दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अपहरण मुलांचा शोध घेत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : May 22, 2023, 9:25 PM IST

ठाणे : १० दिवसापूर्वीच अंबरनाथ शहरातून ४ शाळकरी मुले बेपत्ता झाली होती. मात्र, ही चारही मुले गोव्यात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गोवा गाठत चारही मुलांना अंबरनाथमध्ये आणून त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ भिवंडीतील विविध भागातून दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल - बेपत्ता झालेली तिन्ही मुले ही १३ ते १५ वयोगटातील असून पोलिसांनी तिन्ही मुलांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील गैबीनगर भागातील डॉ. इक्बाल बिल्डिंगमध्ये राहणारा नुमान अन्सारी ( वय, १४) हा २० मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास दुकानात चीज आण्यासाठी जातो म्हणून घरच्यांना सांगून गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे मुलांच्या कुटुंबीयांनी प्रथम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध घेऊनही थांगपत्ता न लागल्याने मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात ईसमावर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस तपास सुरू - दुसऱ्या घटनेत भिवंडीतील चौहान कॉलनीतील केजीएन चौक जवळील सभागृहाजवळ राहणारा इम्रान कुरेशी (वय १४) हा १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घराबाहेर खेळण्यासाठी जातो म्हणून घरी सांगून गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र तो आढळून आला नसल्याने त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांकडून शोध सुरू - याचप्रकारे भिवंडीतील दिवान शहा दर्गा जवळील चमन चाळीत राहणारा जुम्मन उर्फ शबान खान ( वय १५) हा १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू असता, त्याचा बराच वेळ शोध घेऊनही तो न सापडल्याने भोईवाडा पोलिसांनी त्याच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ - यापूर्वीही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील वेगवेगळ्या भागातील ४ शाळकरी मुले बेपत्ता झाली होती. ती सर्व एकाच शाळेत शिकत होती. ही मुले सकाळी 7 वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली, मात्र ती शाळेत पोहचलीच नाहीत. मुलांच्या पालकांनी अंबरनाथ आणि इतर शेजारच्या भागात त्यांचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाहीत. एका मुलाच्या शिक्षकाने मुलाच्या पालकांना फोन करून कळवले की त्यांचा मुलगा शाळेत आला नाही. जेव्हा विद्यार्थ्याचे पालक तपासणीसाठी शाळेत गेले तेव्हा त्यांना समजले की इतर तीन मुले देखील शाळेत आली नाहीत. त्यानंतर या चार मुलांच्या पालकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मुलांचा शोध सुरु केला होता. ही चारही मुले गोव्यात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गोवा गाठत चारही मुलांना अंबरनाथ मध्ये आणून त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली होती.

हेही वाचा -

  1. Bee Attack In lohare : रक्षा विसर्जनावेळी मधमाशांचा हल्ला; २५ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
  2. Thane Crime : अट्टल सात गुहेगारांकडून २३ गुन्ह्यांची कबुली, भिवंडी पोलिसांनी जप्त केला लाखो रुपयांचा मुद्देमाल
  3. Thane Crime: आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड, १२ आरोपी अटक

ABOUT THE AUTHOR

...view details