ठाणे - मुंबईसह ठाणे जिह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २४ लाखांचे स्फोटकासह तीन जणांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु केला आहे. अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील (वय ३४ वर्ष), पंकज अच्छेलाल चौहान ( वय २३ वर्ष) समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा (वय २७ वर्ष,) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून तिघेही पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे राहणारे आहेत.
सापळा रचून पकडली आरोपीसह स्फोटके
भिवडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की एका मारूती इको कारमधून काही जण स्फोटक घेऊन येणार आहे. त्यानुसार आज सायंकाळच्या सुमारास भिवंडी वाडा मार्गावरील नदीनाका, पोलीस चौकी समोर सापळा रचला होता. त्यानंतर मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे मारूती इको कार क्रमांक MIH-04/FZ-9200 या कारला थांबवून गाडीत असलेले अल्पेश उर्फ बाल्या, पंकज चौहान, समीर उर्फ सम्या यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष गाडीची पाहणी केली. कारमध्ये जिलेटीनचे बॉक्स ५ त्यामध्ये प्रत्येकी २०० नग, असे एकूण एक हजार आणि एक हजार डीटोनेटरसह मारूती इको कार असा एकूण ४ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल आढळून आला.
बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या मदतीने स्फोटके जप्त