महाराष्ट्र

maharashtra

संतापजनक! सात वर्षीय चिमुरडीवर सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या

By

Published : Sep 22, 2019, 9:32 PM IST

रोजच्या प्रमाणे तिला सकाळच्या सुमारास रिक्षाचालकाने शाळेत सोडले होते. त्यांनतर दुपारी शाळा सुटल्यानंतर पीडित चिमुरडीला बहाण्याने या तिनही नराधमांनी शाळेशेजारी असलेल्या पडक्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

धक्कादायक! सात वर्ष्याच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 3 नराधमांना बेड्या

ठाणे - दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ७ वर्षीय चिमुरडीला ३ नराधमांनी शाळेच्या लगत असलेल्या पडक्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील भागात घडली.

धक्कादायक! सात वर्ष्याच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 3 नराधमांना बेड्या

हे ही वाचा -संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिनही नराधमांना अटक करण्यात आली आहे. नवीन जसुजा (वय २४), अजय दोहारे (वय ३४), विक्रम पुरोहित (वय १९) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत. ते याच शाळेच्या परिसरात असलेल्या दुकानदारांची मुले आहेत.

हे ही वाचा -धक्कादायक..! १० वर्षीय चिमुरडीवर बापाचा बलात्कार, नराधम अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील एका सोसायटीत पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. रोजच्याप्रमाणे तिला सकाळच्या सुमारास रिक्षाचालकाने शाळेत सोडले होते. त्यांनतर दुपारी शाळा सुटल्यानंतर पीडितेला बहाण्याने या नराधमांनी शाळेशेजारी असलेल्या पडक्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे या पीडित चिमुरडीवर गेल्या काही दिवसांपासून हे नराधम अत्याचार करीत असल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हे ही वाचा -चेंबूर लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडितेचा मृत्यू झाल्यावर अहवाल मागवला, महिला आयोग झोपेत होते का? - सुप्रिया सुळे

दरम्यान, पीडित चिमुरडीच्या नातेवाईकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिनही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता २४ संप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details