ठाणे : दुचाकीवरून आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे टी-शर्ट आणि डोक्यात काळे हेल्मेट घालून भर रस्त्यातून बँकमधील कॅशीयरच्या हातातून ११ लाख ७५ हजारांची रोकड असलेली बॅग धूम स्टाईलने पळविणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. अरशद मोहम्मद इलियास मोह. मन्सुरी (वय २२ ), अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी (वय २४ ), सैफअली मोह. मुस्तफा खान, (वय २५ ) असे अटक केलेल्या आरोपींची नाव ( Three accused arrested in Thane ) आहेत.
11 लाख 75 हजारांची रोकड चोरण्याचा प्रयत्न - भिवंडीतील बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँकचे कॅशीयर रिजॉय जोसेफ फरेरा, व त्यांचे सुरक्षारक्षक हे दोघे एका दुचाकीवरून २९ ऑक्टोंबर रोजी दुपारी बँकेची ११ लाख ७५ हजाराची रोख रक्कम आय.डी.बी.आय. बॅक, कल्याण रोड शाखा येथे भरणा करणे करीता जात होते. त्याच सुमाराला भिवंडी - कल्याण रोडला लाईटच्या ट्रान्सफॉर्म जवळ, पंजाब नॅशनल बँकेचे समोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी येताच, दुचाकीवरून झोमॅटोचे टी-शर्ट घातलेले व दुसऱ्या दुचाकी वरील दोघांनी काळे हल्मेट घातलेल्या दोन अज्ञात आरोपीने बँक कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या झोमॅटो टी-शर्ट परिधान केलेल्या आरोपीने बँक कॅशीयरच्या हातातील बॅग खेचून कल्याणच्या दिशेने धूम स्टाईलने पळून गेले होते. याप्रकरणी बँक कॅशियरच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
आरोपींना पकडण्यात यश - घटनेच्या दिवसापासून पोलीस पथकाने भिवंडी ते कल्याण मार्गावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणी केली. त्यापैकी आरोपी हे भिवंडी – कल्याण मार्गावरील एका टेलरच्या दुकानात गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकाने या लेटरकडे अधिक चौकशी केली असता, त्यामधून आरोपीचे नाव पोलिसांना समजले. त्यानंतर घटनास्थळ व अन्य ठिकाणचे मोबाईल डाटा (लोकेशन) घेवून तांत्रिक तपास सुरु केला. त्यावेळी आरोपींचे मोबाईल लोकेशन उत्तरप्रदेश मधील लखनऊमध्ये असल्याचे दाखवताच सपोनि पवार व तपास पथक ताबडतोब लखनऊला दाखल होऊन तेथील एस.टी.एफ. पथकाची मदत घेत, आरोपी अरशद मन्सुरी, अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी, यांना ताब्यात घेतले.