महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kidnapping in Bhiwandi : अश्लील मॅसेज पाठवून तरुणाचे अपहरण, त्रिकुटाला अटक - गुगल पे

उत्तर प्रदेश येथील एका गावात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघा जणांनी मुंबईतील 20 वर्षीय तरुणाला अश्लील मॅसेज पाठवून त्याचे अपहरण करून त्याला भिवंडीतील एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणीही अपहरणकर्त्यांनी केली. मात्र, पोलिसांकडे हे प्रकरणात जाताच शांतीनगर पोलिसांनी ( Shanti Nagar Police Station ) तिघांही अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. लाल मोहम्मद फकीर, शकील मोहम्मद फकीर, नेहा लाल मोहम्मद फकीर (सर्व रा. धामणकर नाका भिवंडी), असे अटक केलेल्याची नावे असून यामध्ये नवरा बायकोचा समावेश आहे. तर सज्जन अली शब्बीर अली फकीर ( वय 20 रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई ), असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेल्या तरुणाचे नाव आहे.

Shanti Nagar Police Station
शांती नगर पोलीस ठाणे

By

Published : Feb 7, 2022, 6:53 PM IST

ठाणे - उत्तर प्रदेश येथील एका गावात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघा जणांनी मुंबईतील 20 वर्षीय तरुणाला अश्लील मॅसेज पाठवून त्याचे अपहरण करून त्याला भिवंडीतील एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणीही अपहरणकर्त्यांनी केली. मात्र पोलिसाकडे हे प्रकरणात जाताच शांतीनगर पोलिसांनी ( Shanti Nagar Police Station ) तिघांही अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. लाल मोहम्मद फकीर, शकील मोहम्मद फकीर, नेहा लाल मोहम्मद फकीर (सर्व रा. धामणकर नाका भिवंडी), असे अटक केलेल्याची नावे असून यामध्ये नवरा बायकोचा समावेश आहे. तर सज्जन अली शब्बीर अली फकीर ( वय 20 रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई ), असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेल्या तरुणाचे नाव आहे.

असा रचला अपहरणाचा कट -सज्जन अली शब्बीर अली फकीर याचे उत्तरप्रदेश मधील मूळ गावी एका व्यक्ती सोबत भांडण झाले होते. त्याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी लाल मोहम्मद फकीर, शकील मोहम्मद फकीर, नेहा लाल मोहम्मद फकीर या तिघांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला ( Kidnapping in Bhiwandi ) होता. विशेष म्हणजे अपहरणाच्या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी एक नवा सिमकार्ड घेऊन त्याद्वारे इंदु नावाची आभासी व्यक्ती बनून 13 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान फिर्यादी याच्याशी मोबाईल द्वारे संभाषण सुरु केले.

अश्लील मॅसेजमुळे तरुण अडकला -अपहरण झालेल्या तरुणाला मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून 5 फेब्रुवारी रोजी भेटीचे आमिष दाखवून फोन करुन भिवंडी शहरातील नारपोली येथे बोलावले होते. त्याच अश्लील मॅसेजमुळे तो तरुण त्याच्या मित्रासह भिवंडीत सकाळी 8 वाजता आला. त्यावेळी त्याचे अपहरण करून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत लाल मोहम्मद याने त्याचा भाऊ कलाम यांचे शांतीनगर, भिवंडी येथील बाबा हॉटेल जवळील एका खोलीत डांबून ठेवले. त्याच्याकडून 20 हजार रुपये दे नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करीत मारहाण केली. बेदम मारहाण केल्याने भयभीत झालेल्या सज्जन अली शब्बीर अली फकीर याने आई, भाऊ, अरमान, असलम यांना तसेच त्याचे मालक बाबू शेठ यांना 'गुगल पे'वरुन ( Google Pay ) पैशाची मागणी केली. त्यामुळे हा प्रकार समोर आला.

मोबाईल लोकेशनवरून आरोपी अटक -या बाबतची तक्रार शांतीनगर पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शांतीनगर बाबा हॉटेल परिसरातील एका खोलीतून दोघांची सुटका करत तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे करीत आहेत.

हेही वाचा -Search Of Bogus Doctor : ५ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर बोगस डॉक्टरची शोध मोहीम

ABOUT THE AUTHOR

...view details