रमजान ईद : दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण - भिवंडी रमाजन ईद सामूहिक नमाज बातमी
कल्याण पश्चिम मधील दुर्गाडी किल्ला परिसरात एकच उत्साह दिसून आला सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते . यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.
![रमजान ईद : दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण thousands of muslims perform namaz in durgadi fort area on occasion of ramadan eid in thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15182726-49-15182726-1651576089680.jpg)
ठाणे - दोन वर्षानंतर देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोना निर्बंधांमुळे ईद साजरी करण्यावर मर्यादा होत्या. ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली.
दुर्गाडी किल्ला परिसरात उत्साह - कोरोना निर्बंधामुळे दोन वर्ष या ठिकाणी मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता आले नाहीत. यंदा मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झालेत. त्यामुळे कल्याण पश्चिम मधील दुर्गाडी किल्ला परिसरात एकच उत्साह दिसून आला सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते . यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.