नवी मुंबई - उरण शहर व जेएनपीटी टाउनशिप येथे दोन रुग्ण आढळल्यानंतर आता उरण ग्रामीण परिसरातील जासई या गावाजवळील रेल्वे वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. यामुळे उरण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरणमध्ये सापडला तिसरा कोरोनाबाधित रुग्ण - mumbai corona news
उरणमध्ये आज तिसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथील वातावरण अधिक भीतीदायक झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा रुग्ण 28 वर्षीय असून आजारी असल्याने मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत होता. या दरम्यान कोरोनासंदर्भात चाचणी केली असता हा तरुण पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे
![उरणमध्ये सापडला तिसरा कोरोनाबाधित रुग्ण उरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6846940-401-6846940-1587222782832.jpg)
उरणमध्ये आज तिसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथील वातावरण अधिक भीतीदायक झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा रुग्ण 28 वर्षीय असून आजारी असल्याने मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत होता. या दरम्यान कोरोनासंदर्भात चाचणी केली असता हा तरुण पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे उरण तहसीलदार यांच्याकडून तो राहत असलेली जासाई रेल्वे वसाहत परिसर बंद केला आहे.
हा तरुण जासाई ते जेएनपीटी या रेल्वे ट्रॅकचे काम करणारा लाईनमन असल्याची माहिती मिळाली आहे. उरणच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या जासाई गावात हा रुग्ण सापडल्याने आता उरण तालुक्यातील नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.