महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ulhasnagar Crime News : ८ लाखांच्या जीन्स पॅन्टवर डल्ला मारणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद

उल्हानसागर शहरातील कॅम्प नंबर ३ परिसरात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास शटर उचकाटून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी दुकानातील जीन्स कपड्याचे ३३ रोलसह दीड हजारच्या वर जीन्स पॅन्ट एका टेम्पोत टाकून पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Thieves stealing jeans caught on CCTV). (Ulhasnagar Crime News)

CCTV
सीसीटीव्ही

By

Published : Jan 8, 2023, 10:07 PM IST

चोरटे सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर(ठाणे ) : कारखान्यासह दुकानाचे शटर तोडून त्यामधील ८ लाखाहून अधिक रुपयांच्या जीन्स पॅन्टवर चोरट्याच्या टोळीने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन भागात सीएचएम कॉलेज परिसरातील यश इंटरप्राइजेस व जय भवानी इंटरप्राइजेसच्या कपडे विक्रीच्या दुकानात घडली आहे. विशेष म्हणजे जीन्स पॅंटवर डल्ला मारणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. (Thieves stealing jeans caught on CCTV). (Ulhasnagar Crime News)

पोलीस निरीक्षक आणि कापड विक्रेते

दीड हजाराच्यावर जीन्स पॅन्टची चोरी : उल्हानसागर शहरातील कॅम्प नंबर ३ परिसरात कापड विक्रेते यश चंदन मोटवानी यांचे यश इंटरप्राइजेस तसेच इतरांचे जय भवानी इंटरप्राइजेससह एकून तीन दुकाने आहेत. शुक्रवारी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाचे शटर उचकाटून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी दुकानातील जीन्स कपड्याचे ३३ रोलसह दीड हजारच्या वर जीन्स पॅन्ट एका टेम्पोत टाकून पळून गेले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध: मात्र या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाली असून चोरी झालेल्या जीन्स कपड्याची एकून किंमत ८ लाख ३८ हजार ६० रुपये आहे. शनिवारी चोरीची घटना उघड झाल्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेज व चोरटयांनी चोरीचे साहित्य लंपास करण्यासाठी आलेल्या टेंम्पोच्या आधारे मध्यवर्ती पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांमध्ये चोरट्यांची दहशत: उल्हासनगर पोलीस परिमंडळामध्ये आठ पोलीस ठाणे असून दिवसाआड चोरी, घरफोड्याच्या घटना वाढल्याचे विविध पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या नोंदीवरून उघडकीस आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चोरट्याची दहशत पसरल्याने व्यापारी संघटनांकडून अश्या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details