ठाणे -ठाण्यात चोरट्यांचे कारनामे सुरूच असून भुरट्या चोरांनी चक्क ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाण्याचे विद्युत मीटर पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, ठाणे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - आसारामला उच्च न्यायालयाचा दणका; जन्मठेपला आव्हान देणारी याचिका फेटाळली
चेंबूर (मुंबई) येथे राहणारे करण गुडासिंग यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ठाण्यातील कोर्टनाक येथील भिवंडीवाडा टेरेस इमारतीजवळील ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाच हजार रुपये किमतीचे पाण्याचे विद्युत मीटर अज्ञात चोरट्यांनी पळवले. ही घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - धुळे: 12 वर्षीय चिमुकलीवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न