महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CCTV : दिवसाढवळ्या कारची काच फोडून पाच लाखांची रोकड लंपास - उल्हासनगर गुन्हे बातमी

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारच्या दरवाजाची समोरील काच फोडून गाडीतील पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केल्याची ( rob five lakh rupees ) घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

photo
छायाचित्र

By

Published : Dec 1, 2021, 7:48 PM IST

ठाणे - पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारच्या दरवाजाची समोरील काच फोडून गाडीतील पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केल्याची ( rob five lakh rupees ) घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही

50 सेकंदात 5 लाखाची रोकड असलेली बॅग लंपास

व्यापारी राजनारायण यादव यांचे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन भागातील शांतीनगर परिसरात स्लॉडिंगचे दुकान आहे. राजनारायन यांनी शुक्रवारी (दि. 26 नोव्हेंबर ) दुपारच्या सुमारास दुकानासमोर कार उभी केली होती. यावेळी चोरट्याने कारची काच फोडून आतमधील पैशाने भरलेली बॅग लंपास केली. त्यात तब्बल पाच लाखांची रोख रक्कम होती. विशेष म्हणजे चोरीची घटना 50 सेंकदात घडली असून संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे करत आहे.

हे हा वाचा -Rape on Minor Girl : कारागृहात बंद असलेल्या आईला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details