महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवलीत मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पळवले १७ लाखांचे मोबाईल - Thieves rob a mobile phone shop

डोंबिवली पश्चिमेकडील दिनदयाळ रोड येथे स्वस्तिक टेलकॉम नावाने मोबाईल खरेदी-विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकानमालक दुकान बंद करुन घरी निघून गेले.

मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पळवले १७ लाखांचे मोबाईल

By

Published : Sep 26, 2019, 5:21 PM IST

ठाणे - येथील कल्याण डोंबिवलीमध्ये दुकानाचे कुलूप तोडून लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेण्याच्या घटना वाढत असून दुकानदार धास्तावले आहेत. त्यातच काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी डोंबवलीमधील एका मोबाईलच्या दुकानात चोरी केली. यात तब्बल 127 मोबाईल, रोकड असे मिळून सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. त्यामुळे दुकानदरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सूरु केला आहे.

मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पळवले १७ लाखांचे मोबाईल

हेही वाचा-पुण्यात पुराच्या पाण्यात एकाच गोशाळेतील 35 गायींचा मृत्यू

डोंबिवली पश्चिमेकडील दिनदयाळ रोड येथे स्वस्तिक टेलकॉम नावाने मोबाईल खरेदी-विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकानमालक दुकान बंद करुन घरी निघून गेले. ही संधी साधत चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानात घुसले. दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे 127 मोबाईल, मोबाईलचे साहित्य तसेच 30 हजारांची रोकड त्यांनी चोरली. ही एकूण 17 लाख 29 हजार 942 रुपयांचा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले आहे. आज सकाळी दुकानातील कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले. त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. हा चोरटा दुकानातील सीसीटीव्हीमध्य कैद झाला आहे. याप्रकरणी दुकान मालकाने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details