ठाणे - गोदामाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी चक्क चप्पल, बूट व सॅंडलच्या साठ्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील जय माता दी कॉम्प्लेक्स समोरील गोदामात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
69 हजार 934 रुपये किमतीच्या चप्पल, बूट लंपास -चोरटे कशावर डल्ला मारतील याच नेम नाही. अशाच एका घटनेत काल्हेर येथील जय माता दी कॉम्प्लेक्स समोरील गोदामात 3 ते 4 जून, 2022 दरम्यान ए.के. शूज. ट्रेडिंग लि. या कंपनीच्या गोदामाची मागील भिंतीला भगदाड करुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गोदामातील 69 हजार 934 रुपये किंमतीच्या चप्पल, बूट व सॅंडल, असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी मॅनेजर विरेन हेमचंद देढीया यांनी अज्ञात चोरट्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
गोदामाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी मारला चप्पल, बूट व सॅंडलवर डल्ला - Thieves broke into the warehouse
गोदामाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी चक्क चप्पल, बूट व सॅंडलच्या साठ्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील जय माता दी कॉम्प्लेक्स समोरील गोदामात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
news