ठाणे -चोरटयांनी गोदामचे शटर तोडून त्यामधील हजारो रुपये किंमतीचे चॉकलेटसह मिठाईचे बॉक्स चोरटयांनी लंपास केले आहेत. ही अजब चोरीची गजब घटना इंडियन कॉर्पोरेशनमधील एस. के. इंडस्ट्रीज गोदामात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
४७ हजार २२४ रुपयांचे चॉकलेट आणि मिठाई लंपास..
अजब चोरी.. गोदाम फोडून चोरटयांनी चॉकलेटसह मिठाईचे बॉक्स केले लंपास
चोरटयांनी गोदामचे शटर तोडून त्यामधील हजारो रुपये किंमतीचे चॉकलेटसह मिठाईचे बॉक्स चोरटयांनी लंपास केले आहेत. ही अजब चोरीची गजब घटना इंडियन कॉर्पोरेशनमधील एस. के. इंडस्ट्रीज गोदामात उघडकीस आली आहे.
प्रत्येक जीवनाश्यक वस्तू महागल्याने सर्व सामान्य नागरिकांचे जीवन जगणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून जीवनाश्यक वस्तूच्या चोरी जाण्याच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. त्यातच भिवंडी तालुक्यातील गूंदवली ग्रामपंचायत हद्दीत इंडियन कॉर्पोरेशन कंपनीचे एस.के.इंडस्ट्रीज गोदाम आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास या गोदामाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने गोदामातील चॉकलेटसह मिठाईच्या बॉक्स लंपास केले. त्यामध्ये फ्रुट जेली १ बॉक्स, फ्रुट जेली जार १ बॉक्स, महेक चोकोबार ५ बॉक्स, मिल्क अँड नट नारीयल मिठाई १ बॉक्स असे एकूण ४७ हजार २२४ रुपयांचे चॉकलेट आणि मिठाई लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस अधिकारी ए. वाय. बोडक करत आहेत.