ठाणे -कल्याण डोंबिवलीत एका चोरट्याने दुकानातून मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे. मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने दुकानात येऊन ५० हजार रुपयांचा महागडा मोबाईल लंपास केला. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
50 हजारांचा मोबाईल चोरी करुन चोरटा फरार, घटना सीसीटीव्हीत कैद - ठाणे मोबाईल चोरी बातमी
कल्याण डोंबिवलीत एका चोरट्याने दुकानातून मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे. मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने दुकानात येऊन ५० हजार रुपयांचा महागडा मोबाईल लंपास केला. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
![50 हजारांचा मोबाईल चोरी करुन चोरटा फरार, घटना सीसीटीव्हीत कैद thief steal mobile in shop](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9518020-652-9518020-1605145229927.jpg)
चोरट्याचा शोध
कल्याण डोंबिवली शहरात अनलॉक काळात चोऱ्या, लुट अशा घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना कल्याण पश्चिम परिसरातील खडकपाडा येथील पूजा एनएक्स या मोबाईल दुकानात घडली आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता हा चोरटा मोबाईल घेण्याच्या बहाण्याने दुकानात आला होता. त्यानुसार दुकानदाराने त्या चोरट्यासमोर विवो कंपनीचे महागडे मोबाईल ठेवले. त्यावेळी बोलण्याच्या नादात गुंतवून सुमारे ५० हजार रुपयांचा मोबाईल चोरुन आरोपी पळून गेला. मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे.
हेही वाचा -गोंदिया पोलिसांना १० वर्षापासून चकमा... अखेर छत्तीसगडमध्ये जेरबंद केला जहाल नक्षली