अटक करण्यात आलेल्या बंटी-बबलीविषयी माहिती देताना पोलीस ठाणे : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात राहणारा महेश पाटील हा केबल व्यावसायिक (Fraud of cable businessmen) आहे. या व्यावसायिकाचे फेसबुकवर अकाऊंट असून त्याच्या अकाऊंटवर संस्कृती खेरमनकर नामक महिलेने मैत्री करण्यासाठी फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाठवली होती. तिची रिक्वेस्ट महेशने स्वीकार, केली. त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून दोघांत मेसेजची देवाण-घेवाण सुरू झाली. त्यातच महेशन त्या महिलेला बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावाजवळच्या कोहिनूर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बोलविले. (Thief Couple Arrested In Thane) त्यानंतर २१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बबली हॉटेलमधील एका रूममध्ये आली. या हॉटेलच्या रूममध्ये महेश आणि बबलीने दारू पार्टी करून दोघेही मद्यधूंद झाले असतानाच रात्री अकराच्या सुमारास हा महेश शौचास गेला. तेव्हा त्याने अंगावरील दागिने व रिव्हॉल्वर बाहेर ठेवून गेला होता. हीच संधी साधून बबलीने सोन्याचे दागिने, मोबाईल, रिव्हॉल्व्हर असा 4 लाख 75 हजारांचा ऐवजासह पळ काढला. (ran away with jewelery and revolver)
बबलीचा शोध सुरू :या संदर्भात व्यावसायिकाने दुसऱ्या दिवशी दुपारी पोलिस मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फेसबुक झालेल्या मैत्रिण बबलीच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी हॉटेल मधील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत बबलीचा शोध सुरु केला. विशेष म्हणजे तक्रार गंभीर स्वरुपाची असल्याने परवानाधारक रिव्हॉल्व्हर चोरीस गेले होते. सदर रिव्हॉल्व्हरचा आरोपी बबली ही गैरवापर करण्याची दाट शक्यता होती. घटनेचे गांभीर्य ओळखुन वपोनिरी. शेखर बागडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सुनील तारमळे यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून तक्रारदार महेशच्या फेसबुकच्या माध्यमातून आरोपी बबलीचा शोध सुरवात करण्यात आली.
फेसबुक अकाऊंट वरून आरोपी बबलीच्या घराचा शोध
फेसबूकवरून शोधला बबलीचा पत्ता :तिच्या फेसबुक अकाऊंट चेक करुन, तिच्या नावाची खात्री करून तिच्यावर यापूर्वी अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत काय याचा तपास केला असता, आरोपी बबलीच्या नांवे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अश्याच प्रकराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपी बबली खार, मुंबई येथे राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानंतर मानपाडा पोलीस पथक मुंबईतील खार परिसरात असलेल्या आरोपी बबलीच्या घराचा शोध घेतला असता, तर ती गोवा राज्यात रहावयास गेल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथक गोवा येथे आरोपी बबलीच्या शोध घेत असता ती गोवा राज्यातील पेड म्हापसा, जि. बारदेज या ठिकाणी असल्याचे माहिती मिळताच पोलिसानी या ठिकाणी सापळा रचून तिला ताब्यात घेतले.
बदनामीच्या भितीने लोकांची तक्रार नाही :आरोपी बबलीकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तिने फेसबुकचे माध्यमातुन अनेक लोकांशी संपर्क साधुन त्यांचा विश्वास संपादन करुन, त्यांना वेगवेगळया हॉटेलमध्ये बोलावुन, त्यांना दारुमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकुन, त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तु चोरी करुन पळुन जात होती. मात्र बदनामीच्या भितीने लोक तक्रार करीत नसल्याचे पाहुन तिचे गुन्हे करण्याचे धाडस वाढुन तिने अश्या प्रकारे अनेक नागरीकांची फसवणूक केल्याची पोलिसांना कबुली दिली. खळबळजनक बाब म्हणजे चोरलेल्या वस्तु ती तिचा साथीदार बंटी कडे ठेवत असायची, त्यानंतर त्या चोरीच्या वस्तु आरोपी बंटी बाजारात स्वस्तात विकत असल्याचे समोर आले.
२० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत :पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपी बंटी बबलीकडून १६ मोबाईल फोन, १ रिव्हॉल्डर, दोन महागडे घडयाळे, २९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण २० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आतापर्यत हस्तगत केला आहे. आरोपी बबलीवर यापुर्वी डोंबिवली रेल्वे ठाण्यात व नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली आहे.